no images were found
नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर
नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी आणि कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार रुपये भाव द्यावा आदी मागण्या आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याच्या भावात सातत्याने होणाऱ्या घसरणीचा निषेधार्थ मनमाडला महाविकास आघाडीच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. तसेच चांदवड रस्त्यावर कांदा ओतत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या सप्ताहापासून कांद्याच्या भावात सारखी घसरण सुरू असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह महा विकास आघाडीच्या वतीने ‘कांदा लिलाव’ बंद पाडत नाशिकच्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मनमाड – चांदवड रस्त्यावर कांदा ओतत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाच्या धोरणाचा निषेध केला. आंदोलनात शेतकरी व महाविकास आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या आंदोलनामुले दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी आणि कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे.
कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, कांद्याला प्रति क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव द्यावा…१५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..आंदोलनामुळे मनमाड – चांदवड रोडवर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
या आंदोलनात शिवसेना ( उद्धव ठाकरे ) गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे इतर घटक पक्ष सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा मुद्दा अधिकच विघळत चालला आहे. त्यामध्ये आता राजकीय पक्षही आक्रमक झाले आहे लाल कांद्याचा भाव हजार रूपयाच्या आतमध्ये आल्यानं शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने कांद्यावर निर्यात बंदी लावली जात असल्याने व्यापारी कांदा खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कांदा तसाच पडून राहतो. त्यामुळे कांद्याचे दर कमी राहतात, परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते. कांद्यावर असलेली निर्यात बंदी उठवावी अशी मागणीही पुन्हा केली जात आहे.