no images were found
जिल्ह्यात १८ व १९ फेब्रुवारी रोजी ड्रोनव्दारे चित्रीकरणास बंदी
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दौ-या निमित्त उपस्थित राहणार असल्याने व विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने सर्व मान्यवरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२३रोजी रात्री १२ वाजेपर्यंत कोल्हापूर विमानतळ परिसर व संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास ड्रोन व्दारे चित्रिकरणास बंदी घातली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
केंद्रीय गृह मंत्री यांचा दि. १९ फेब्रुवारी २०२३रोजी जिल्हा दौरा असून दौ-या दरम्यान जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे देखील उपस्थित राहणार असून केंद्रीय गृहमंत्री यांना झेड प्लस सुरक्षेसह एएसएल वर्गवारी आहे. केंद्रीय गृहमंत्री जिल्हा दौरा कालावधीत कोल्हापूर विमानतळ, पंचशिल हॉटेल, महालक्ष्मी मंदीर, एस.एम लोहिया हायस्कूल, नागाळा पार्क येथे सभा, छत्रपती शाहू महाराज पुतळा, दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी चौक, हॉटेल पॅव्हेलियन या ठिकाणी जाणार असल्याने संरक्षित व्यक्ती यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानतळ परीसर व संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. असे या आदेशात म्हंटले आहे.