no images were found
आता भारतीय वंशाचे नील मोहन यूट्यूब चे नवे सीईओ
नवी दिल्ली:- आता भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे व्यवस्थापकीय संचालक असतील. नील मोहन यूट्यूबच्या वरिष्ठ उपाध्यक्षाची भूमिकाही पार पाडणार आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे. जगभरात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबचे व्यवस्थापकीय संचालक सुसान वोजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने ही माहिती दिली आहे.
नील मोहन सध्या यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०१५मध्ये तो यूट्यूबशी जोडले गेले होते. नील मोहन सध्या यूट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसरपदी विराजमान होते.नील मोहन आता मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अँडोबचे सीईओ शांतनु नारायण आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह यूएस जागतिक दिग्गजांच्या भारतीय वंशाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यादीत सामील होतील.
नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले आहे. मोहन यांनी एक्सेंचरमध्ये वरिष्ठ ऍनालिस्ट म्हणूनही काम केले आहे. यानंतर ते डबलक्लिक इंक मध्ये रुजू झाले आणि तेथे त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले. नील मोहन यांनी या कंपनीत ग्लोबल क्लायंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून ३ वर्षे पाच महिने काम केल्यानंतर त्यांनी सुमारे २ वर्षे ७ महिने कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट बिझनेस ऑपरेशनची जबाबदारी सांभाळली. यानंतर ते मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाले आणि येथे चार महिने काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा डबलक्लिक इंक जॉईन केले जेथे त्यांनी सुमारे तीन वर्षे सेवा दिली. नील मोहन हे स्टिच फिक्स, जीनोमिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी च्या बोर्डवर देखील काम केले आहेत. त्यानंतर मोहन यांनी जवळपास आठ वर्षे गुगलच्या व्हिडिओ जाहिरात शाखेत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून म्हणून काम केले.
नील मोहन यांनी यूट्यूबला एक सर्वोच्च उत्पादन बनवण्यात आणि टीमची स्थापना करण्यात मोठे योगदान दिले आहे. यूट्यूब, यूट्यूब म्युझिक आणि प्रीमियम आणि शॉर्ट व्हिडिओंसह काही सर्वात मोठी उत्पादने लाँच करण्यात मोहन यांचा मोलाचा वाटा आहे.