Home सामाजिक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरात गुरुवारी स्वच्छता मोहिम

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरात गुरुवारी स्वच्छता मोहिम

8 second read
0
0
45

no images were found

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरात गुरुवारी स्वच्छता मोहिम ,सर्व सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे, तालीम संघानी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त ” स्वच्छ भारत दिन” साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महापालिकेच्यावतीने सकाळी ७ ते ९ या वेळेत रंकाळाच्या संपूर्ण परिसराची महास्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.  यादिवशी सर्व महानगरपालिका शाळांची प्रभात फेरीही काढण्यात येणार आहे. प्रभात फेरीचा मार्ग प्रत्येक शाळेपासून रंकाळा टॉवर मार्गे पदपथ उद्यान अंबाई टँक पर्यंत असणार आहे. स्वच्छता हरित शपथ व सांगता समारंभ तसेच आरोग्य विभागामार्फत सफाई मित्र आणि स्वच्छता कामगारांचा  सन्मान या ठिकाणी असलेल्या पदपथ उद्यानात घेण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्थानिक  सेवाभावी संस्था यांचा सन्मान, उत्कृष्ट नागरिक , स्वयंसेवक, स्वच्छतादूत, NCC , NSS स्वयंसेवकांना महापालिकेच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

         यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे, तालीम संघांनी मोठया संख्येसह स्वच्छतेच्या साहित्यासह सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधव कोल्हापूर,(प्…