
no images were found
शिर्डीत सहलीला आलेल्या ८८ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
शिर्डी : अमरावतीहून शिर्डीत आलेल्या ८८ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमरावतीतील २३० विद्यार्थी शिर्डीत सहलीसाठी आले होते. नेवासा येथे रात्रीचे जेवण बनवण्यात आले होते. जेवण जेवल्यानंतर ८८ विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील आदर्श हायस्कूलचे इयत्ता चौथी ते सहावीचे हे विद्यार्थी आहेत. एकूण २३० विद्यार्थी नेवासा येथे ज्या ठिकाणी विद्यार्थी थांबले होते, त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी जेवण करण्यात आले होते. काल रात्री जेवण जेवल्यानंतर८८ विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळचा त्रास होऊ लागला.यानंतर रात्री ११ वाजता सर्व विद्यार्थ्यांना शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे.