no images were found
‘पानीपत’पूर्वीच कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज-हेमंत पाटील
मुंबई : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पंरतु, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या ‘कॉंग्रेस’चा मोलाचा वाटा होता तो पक्ष आता नेतृत्वाअभावी गलीतगात्र झाला आहे. या राष्ट्रीय पक्षाला त्यामुळे आत्मचिंतनाची आवश्यकता आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी गुरूवारी व्यक्त केले. संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. पंरतु, नेतृत्व अभावामुळे गेल्या आठ वर्षांपासून कॉंग्रेसची ‘ग्राउंड पातळी’ वरील पकड सुटत चालली आहे. पक्षात जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बराच अभाव असल्याने सर्वसामान्यांना सोबत असलेली नाळ तुटत चालली आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.