no images were found
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट लाँच:१५ मिनिटांचे उड्डाण;३ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित
श्रीहरिकोटा : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)ने नवीन ‘स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल’ हे रॉकेट लाँच केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन लॉन्च सेंटर येथून शुक्रवारी सकाळी ९.१८ वाजता हे प्रक्षेपण झाले. या रॉकेटने १५ मिनिटांच्या उड्डाणात ३ उपग्रह प्रक्षेपित केले. हे लहान उपग्रह प्रक्षेपण मार्केटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
या उपग्रहांमध्ये अमेरिकेचे जानुस-१, चेन्नईच्या स्पेस स्टार्ट-अपचे आझादी सॅट -२ आणि इस्रोचे ईओएस-७ यांचा समावेश आहे. या रॉकेट ने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत १५मिनिटांपर्यंत उड्डाण केले, आणि ४५०किमी दूरच्या कक्षेत उपग्रह सोडले.या रॉकेटचा उद्देश लहान उपग्रह प्रक्षेपित करणे आहे. यासोबतच पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल चा वापर आत्तापर्यंत प्रक्षेपणात मोठ्या प्रमाणात केला जातो.यामुळे ते आता मोठ्या मोहिमांसाठी फ्री राहील. हे रॉकेट ५०० किमी अंतरावरील प्लॅनर ऑर्बिटमध्ये १०ते ५०० किलो वजनाची वस्तू वाहून नेऊ शकते. या रॉकेट सह गेलेल्या पेलोड्समध्ये जानुस -१ चा समावेश आहे. हे एक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर आहे. आझादी सॅट -२ हे एक स्मार्ट सॅटेलाइट मिशन आहे. हे लॉरा आणि रेडिओ संप्रेषण क्षमता प्रदर्शित करेल. संपूर्ण भारतातील ७५ शाळांमधील ७५० विद्यार्थ्यांनी हे तयार केले आहे.