Home क्राईम हवालदाराने केली फौजदाराची  निर्घुण हत्या

हवालदाराने केली फौजदाराची  निर्घुण हत्या

13 second read
0
1
41

no images were found

हवालदाराने केली फौजदाराची  निर्घुण हत्या

 कल्याण : कल्याणमध्ये बुधवारी रात्री झालेल्या रेल्वे सुरक्षा बलातील पोलीस उपनिरिक्षक बसवराज गर्ग यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. हवालदार पंकज यादव याने आपली पगारवाढ रोखल्याच्या रागातून ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.  

            कल्याण पूर्वच्या सिध्दार्थनगर येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वसाहतीमध्ये हा सर्व प्रकार घडला. अंबरनाथ रेल्वे स्थानक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या बसवराज गर्ग (५६) यांची पंकज यादव (३५) या हवालदाराने बुधवारी रात्री दांडक्याने मारहाण करत हत्या केली. पंकज यादव हा रेल्वे सुरक्षा बलाच्या रोहा विभागात कार्यरत आहे. कोळसेवाडी पोलिसांनी गर्ग यांच्या हत्येनंतर काही तासांतच पंकज यादव याला अटक केली आहे. बसवराज गर्ग आणि आरोपी हवालदार पंकज यादव हे दोघे ही २०१९ साली कल्याण रेल्वे सुरक्षा दलात एकत्र कार्यरत होते. त्यावेळी बसवराज गर्ग यांनी पंकज यादव याच्या वेतनवाढीच्या तीन वर्षाबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे अहवाल दिला होता. त्यामुळे पंकज यादव याची वेतनवाढ रोखण्यात आली होती. तेव्हापासूनच यादवने बसवराज गर्ग यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या आणखी तिघांच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती समोर आली आहे.

           बुधवारी रात्री दहा वाजता पोलीस उपनिरीक्षक बसवराज गर्ग हे आपल्या खोलीत गाणी ऐकत झोपले होते. यावेळी खोलीच्या बाहेर गर्ग यांचे सहकारी उपनिरीक्षक राकेशकुमार त्रिपाठी धुतलेले कपडे दोरीवर वाळत घालत होते. त्यावेळी त्रिपाठी यांना कोणीतरी खोलीत गेल्याचे जाणवले. यानंतर अचानक आतून ओरडण्याचा आवाज आल्याने त्रिपाठी यांनी खोलीच्या आतमध्ये धाव घेतली. त्यावेळी गर्ग हे खाली पडल्याचे त्रिपाठी यांनी पाहिले. त्रिपाठी यांनी खोलीत शिरलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता तू मध्ये पडू नको अशी धमकी दिली. यानंतर त्रिपाठी यांनी आरडाओरडा करुन आपल्या सहकाऱ्यांना बोलवले आणि घडलेला प्रकार सांगितला.  इतर सहकारी आल्याचे पाहताच मारेकऱ्याने तिथून पळ काढला. मात्र सहकाऱ्यांनी त्याला पाहिले आणि तो रेल्वे सुरक्षा बलातील हवालदार पंकज यादव असल्याचे समोर आले. त्रिपाठी यांनी बसवराज यांना उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…