no images were found
राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत पहिल्या १० पैकी १० विद्यार्थी केआयटी मेकॅनिकल विभागाचे
कोल्हापूर : राष्ट्रीय स्तरावरील टाटा टेक्नोलॉजी च्या पुढाकाराने सुरू झालेल्या रेडी इंजिनियर या तांत्रिक प्रशिक्षण उपक्रमात देशपातळीवर केआयटीचा झेंडा पुन्हा एकदा अग्रस्थानी राहिला आहे. देशातील शासकीय, मान्यवर खाजगी महाविद्यालयांना मागे टाकत केआयटीने हे निर्विवाद यश संपादित केले आहे. टाटा टेक्नॉलॉजीने घोषित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या १० जणांच्या यादीत केआयटीच्या १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
टाटा टेक्नॉलॉजीने देशातील काही महाविद्यालयांना निवडून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना काळानुरूप विकसित तांत्रिक कौशल्य शिकवण्यासाठी ‘रेडी इंजिनियर’ हा कार्यक्रम सुरू केलेला आहे.महाविद्यालयाच्या तृतीय वर्षातच त्यांना प्रत्यक्ष क्लासरूम व इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट मधून जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ज्ञान देण्याचा रेडी इंजिनियर हा अभ्यासक्रम तयार केला. आहे ‘रेडी इंजिनिअर’ च्या प्रशिक्षणातून उद्योग जगत व शैक्षणिक संस्था यांच्यातील दुवा सांधण्याचा प्रयत्न केला जात आहे. iGET IT ® या ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून त्याच महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रथमत: टाटा टेक्नॉलॉजीजच्या वतीने प्रशिक्षित केले जाते.अशा प्रशिक्षित प्राध्यापकांच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
विद्यार्थ्यांना मेकॅनिकल क्षेत्रातील मूलभूत अशा ऑटोमोटिव डिझाईनचे प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या वेळी अशा या उपक्रमाचा मोठा फायदा होतो.या प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो अशा भावना प्रा.संदेश सांगळे ‘रेडी इंजिनिअर’ उपक्रमाचे महाविद्यालयाचे समन्वयक यांनी व्यक्त केल्या. विविध उद्योगक्षेत्राला देखील अशा प्रशिक्षित विद्यार्थ्यांची आवश्यकता असते.रेडी इंजिनिअर मुळे केआयटीच्या अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगांमध्ये कामाची संधी मिळाली आहे. दररोजचे नियमित वर्ग संपल्यानंतर उपक्रम केआयटी महाविद्यालयात राबवला जातो. महाविद्यालयाच्या कॅम्पुटर लॅब या प्रशिक्षणासाठी वापरल्या जातात.क्लासरूम मधून थियरीचे मार्गदर्शन केले जाते अशी माहिती मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर यांनी दिली.
महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी,उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले व सर्व अन्य विश्वस्त, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार,यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
-: प्रतिक्रिया :-
मौल्यवान ज्ञान देण्यासाठी मी प्रथम टाटा टेक्नॉलॉजी आणि महाविद्यालयाचे आभार मानेन. TTL RE प्रोग्राम मला ऑटोमोबाईल क्षेत्रातील नवीन ट्रेंडबद्दल माहिती देतो. तसेच सैद्धांतिक ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यातील अंतर भरून काढण्यास मदत होते. मी इंडस्ट्रियल ऍप्लिकेशनसह विविध डिझाइन संकल्पना शिकल्या. सॉफ्ट स्किल मॉड्यूल्स मला माझे संभाषण कौशल्य सुधारण्यास मदत करतात आणि कॉर्पोरेट शिष्टाचाराची कल्पना देतात. मला विश्वास आहे की हा कार्यक्रम मला माझे भविष्यातील करिअर घडवण्यासाठी निश्चित मदतगार करेल.
🔸️शंतनू सूर्यवंशी,
रेडी इंजिनिअर’ प्रथम क्रमांक,
(तृतीय वर्ष ,मेकॅनिकल विभाग )
▫️▫️▫️
▪️केआयटी सातत्याने विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासक्रमासोबत प्रॅक्टीकल ज्ञान देण्यासाठी प्रयत्नशील असते.इनप्लांट ट्रेनिंग,पी.बी.एल.,मिनी प्रोजेक्ट,मेजर प्रोजेक्ट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा संबंध इंडस्ट्रीज बरोबर यावा हा हेतू असतो.’रेडी इंजिनियर’ हा अशा उपक्रमांचे फ्लॅग शिप आहे.या उपक्रमाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच पण लाईव्ह प्रश्नांवर काम करायची संधी मिळते.
🔸️डॉ.मोहन वनरोट्टी, संचालक,केआयटी.