no images were found
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे : काँग्रेसचा आक्षेप
मुंबई : शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. परंतु महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळाला पाहिजे. दुर्दैवाने शिवसेनेकडून आम्हाला विचारणा झाली नाही हा आमचा आक्षेप, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. तर विधानपरिषदेत शिवसेनेने विरोधी पक्षनेता केला, त्याला आमचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
विधानपरिषदेत शिवसेनेना विरोधी पक्षनेता केला त्यास आमचा विरोध : नाना पटोले
शिवसेनेने विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेता केला त्याला आमचा विरोध आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. नाना पटोले हे संपूर्ण राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रॅली निमित्त बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची निवड केल्याबद्द नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेकडून आम्हाला विचारणा झाली नाही : बाळासाहेब थोरातांचा आक्षेप
बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळाला पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी जळगावात दिली आहे.