no images were found
‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर उद्या व्याख्यान
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत कोल्हापूर मनपाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत उद्या सकाळी 11 वाजता ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे. महापालिका कर्मचारी तसेच सर्वांसाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायबर इन्स्टिट्यूटचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेंद्र जोशी ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ वर मार्गदर्शन करणार आहेत.
ऑनलाईन फसवणूक, ब्लॅकमेलिंग, आर्थिक फसवणूक, मोबाईलचा अतिवापराचे आरोग्यावर होणारे परिणाम, मुलांच्या अभ्यासावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी महानगरपालिकेचे फेसबुक पेज www.facebook.com/KolhapurCorporation वर भेट देऊन फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर मनपाकडून ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत मनपाकडून कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक स्थळांची व कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता मोहिम विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर, मुकादम व महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांनी केली.