no images were found
सत्तासंघर्षाचा फैसला होणार आता थेट 22 ऑगस्टला
मुंबई : ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे अशी सत्तासंघर्षाची सुनावणी आता थेट 22 ऑगस्टला होणार आहे. याआधी ही सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार होती. तोंडावर असलेले सण-उत्सव आणि आठवड्यातल्या विविध सुट्ट्या या कारणांमुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेतून बंडखोरी करत 40 समर्थक आमदारांसह पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी बंडखोर 16 आमदारांवर कारवाई करण्याचे पत्र तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांना दिले होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना असल्याचा दावा केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. नुकताच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीचा पार पडलेला आहे. तरी या सुनावणीपर्यंत नव्या सरकारवरील टांगती तलवार काही दूर झालेली नाही.