no images were found
गणपतीपुळे समुद्रात बुडलेली महिला अखेर वाचली
रत्नागिरी : कोकणातील समुद्रकिनारी येणारे पर्यटक समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. अशीच एक घटना गणपतीपुळे येथील समुद्रकिनारी घडता घडता टळली. येथील मोरया वॉटर स्पोर्ट्सच्या जीवरक्षकांच्या प्रसंगावधानतेमुळे तीस वर्षीय महिलेचा जीव वाचला आहे. हे जीवरक्षक वेळेवर आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शसाठी कोल्हापूर येथून आलेल्या प्रियांका बालाजी सपाटे (३०, मंगळवारपेठ, ता. जि. कोल्हापूर) या दुपारी १ वाजता समुद्राच्या पाण्यात आंघोळ करत होत्या. मात्र त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. यावेळी जवळच असणारे त्यांची पती बालाजी सपाटे यांनी आरडाओरडा केला. यावेळी तेथे असले जीव रक्षकांच्या हा सगळा प्रकार लक्षात आला त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.