no images were found
शिवसेना शाखा हे लोकांच्या अडचणी सोडवण्याचे केंद्र – संजय पवार
आज शिवाजी पार्क कोल्हापूर येथे शिवसेना शाखेचे उदघाटन झाले शिवसेना शाखा हे लोकांच्या अडचणी सोडवण्याचे केंद्र आहे असे मनोगत संजय पवार यांनी व्यक्त केल . शिवसेना शाखा प्रमुख शौनक भिडे यांच्याबद्दल कौतुक करताना कोल्हापूर कट्टर शिवसेना ग्रुपच्या माध्यमातून माझी ओळख झाली आपले काम चोख करायचे जास्त बोलायचे नाही ,नम्र पणा शिवसेनेला शोभेल अस नियोजनबद्ध काम हे आपल्या कडून होत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम सांगायचे पैसा येतो पैसा जातो …पण एकदा नाव गेले की पुन्हा येत नाही हे बाळासाहेबांचे शब्द आहेत आज आपली सत्ता नाही ,तरी सुद्धा महाराष्ट्रमध्ये शौनक तुमच्या सारखे लाखो शिवसैनिक आज मातोश्री बरोबर प्रामाणिक आहेत. तो पर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला धक्का पोहोचणार नाही असा आमचा ठाम विश्वास आहे
20 % राजकारण आणी ८०% समाजकारण याचा मूलमंत्र देत ज्यांनी मराठी मनाला मराठी जनाला ताठ मानेने जगण्याचा मूलमंत्र देत स्वाभिमानी शिवसेनेची स्थापना केली ..भले त्यातून कितीही वेळेला गद्दार बाहेर पडले असले तरी शिवसेनाही तावून-सुलाखून काळाच्या कसोटीवरच खंबीरपणे उभे राहिली असून शिवसेना आणि हिंदुत्व या दोन गोष्टी कधीही विभागता येणार नाहीत ज्या शिवसेनेला पवित्र शिवसेनाप्रमुखांचा वारसा लाभलेला आहे त्या शिवसेनेच्या कार्यालयातून लोकांच्या अडीअडचणी आणि समस्या निवारण्याचं काम केलं जाईल असे प्रतिपादन शिवाजी पार्क येथील शिवसेना शाखा उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी काढले. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता आज नेते जरी दुसऱ्या बाजूने गेले असले तरी जनतेचा व कार्यकर्त्यांचा प्रचंड पाठिंबा उध्दवजींच्या शिवसेनेला मिळालेला असून शिवसेना पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर भगव स्वप्न साकारल्याशिवाय राहणार नाही उद्धवजींचं कल्पक आणि संयमी नेतृत्व महाराष्ट्राला पसंत पडल असून आज उद्धवजींची शिवसेनाच स्वाभिमानी आणि खुद्दारी व महाराष्ट्राचा स्वाभीमान जपणारी असुन त्याच सातत्य या शाखेच्या उद्घाटनातुन होत आहे असे प्रतिपादन त्यांनी या भाषणात केले या शिवाजी पार्क येथील शिवसेनेच्या शाखा फलकाचे उद्घाटन जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून व फीत कापून झाले यावेळी उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे ,जय भवानी जय शिवाजी घोषणा देण्यात आल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयजयकार करण्यात आला .
यावेळी शहर प्रमुख ,सुनील मोदी,उपशहर प्रमुख विशाल देवकुळे यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक व आभार उपशहर प्रमुख कमलाकर जगदाळे यांनी केले.यावेळी उपस्थित – विजय देवणे, रविकिरण इंगवले, मंजित माने,राजेंद्र पाटील,अवधूत साळोखे,उपशाखा प्रमुख आदित्य पवार,राहुल शिंदे,शिवाजी पाटील, आनंद मैती,सुनील पाटील,अक्षय पवार,उत्तम भालेकर, प्रशांत अक्कीवाटे, रेखा पाटील, अनंत भिडे, वर्षा भिडे, प्रमोद दळवी,शहा ,शिपुगडे, मेहता परिवार ,अभिनंदन पाटील,कुमार जाधव,तौसिफ शेख,रोहित शहा, भिकाजी पाटील,विजयसिंह माने,धनाजी यादव,रणजित आयरेकर, विकी मोहिते, राहुल माळी,विशाल पाटील, सुनील कानूरकर, रघु भावे, वैभव जाधव, मानतेश पकाले,अभिजित बुकशेट,तसेच शहरातील शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते .