no images were found
देवेंद्र फडणवीस , विनय कोरे यांच्यात मुंबई येथे बैठक
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री जोतिबा मंदिर परिसर व पन्हाळा गडावरील विविध विकास कामांच्या संदर्भात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.श्री जोतिबा मंदिर परिसर विकास प्राधिकरण करणेबाबत व पन्हाळा गडाचे संवर्धन करणेबाबत तसेच पन्हाळा गडावरील ऐतिहासिक वास्तूंची काळाच्या ओघात नुकसान झाले आहे त्याची पुर्णेबांधणी करणेबाबत अशा दोन महत्त्वपूर्ण विषयांच्यावर बैठक पार पडली आणि दोन्ही बाबतीत अतिशय सकारात्मक निर्णय झाले.
या बैठकीस अपर मुख्य सचिव रामगोपाल देवरा,प्रधान सचिव विकास खार्गे,प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे,पन्हाळा प्रांताधिकारी अमित माळी,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे,केंद्रीय पुरातत्व खात्याच्या प्रादेशिक संचालिका डॉ.नंदिनी साहू,केंद्रीय पुरातत्व खात्याचे मुंबई विभागाचे अधिक्षक डॉ.राजेंद्र यादव,राज्य पुरातत्व खात्याचे संचालक डॉ.तेजस गर्गे,पन्हाळा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम (दादा),पन्हाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल,जीवन पाटील,सचिन पाटील,पुरातत्व सल्लागार सचिन पाटील,गड संवर्धनचे सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.