Home शैक्षणिक नियमित सूर्यनमस्कार अशीच  जीवनशैली असावी – वैघ  अश्विनी माळकर .

नियमित सूर्यनमस्कार अशीच  जीवनशैली असावी – वैघ  अश्विनी माळकर .

20 second read
0
0
229

no images were found

नियमित सूर्यनमस्कार अशीच  जीवनशैली असावी – वैघ  अश्विनी माळकर .

कोल्हापूर – विविध आजारांना हमखास निमंत्रण देणाऱ्या पिझ्झा –  बर्गर – कोल्ड्रिंक्स या फास्टफूड चा पूर्णपणे त्याग आणि  नियमित योगा –  सूर्यनमस्कार  स्थानिक सकस आहार अशी विद्यार्थी वर्गाची जीवनशैली असावी आणि त्यासाठी शिक्षक आणि पालकांनी आग्रही असावे असे  प्रतिपादन आरोग्य भारतीच्या जिल्हाध्यक्ष वैद्य अश्विनी माळकर यांनी केले . जागतिक सूर्यनमस्कार दिन – रथसप्तमी निमित्त आयोजित कार्यक्रमात आदर्श प्रशाला शिवाजी पेठ  येथे त्यांनी मार्गदर्शन  केले. प्रारंभी योग शिक्षिका डॉ . उल्का  देशपांडे यांनी दोन सत्रात मध्ये मुला –  मुलींच्या कडून सुर्यनमस्काराची  प्रात्यक्षिके करुन घेतली आणि सुर्व नमस्कारा मध्ये असणारी विविध योगासने व त्याचे शरीरास होणारे फायदे याची माहिती दिली .प्रारंभी सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक आर वाय पाटील यांनी यांनी करत आगामी काळात नियमित योग वर्ग सुरू करण्याचा मनोदय ही व्यक्त केला यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबच्या संचालक पदी   निवड झालेले प्रशांत आयरेकर – शाहीर यांचा आरोग्य भारती वतीने चा सत्कार  प्रतिनिधी यांनी प्रमोद व्हनगुते  यांनी  शाल – श्रीफळासह स्वीकारला . सिद्धगिरी  कणेरी मठ येथे येत्या 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ‘सुमंगलम्  पंचमहाभूत लोकोउत्सवाची माहिती आरोग्य सेवक राजेंद्र मकोटे यांनी देत सहा दिवसात  नक्की भेट देऊन देशांतून उपस्थितीत अनेक दिग्गजांचे विचार ऐकावेत  – मूल्य शिक्षणाचा एक  भाग म्हणून या उपक्रमात सहभागी व्हावे असेही आहवान करत यांची माहिती पत्रके  ही दिली . प्रांरभी पाहुण्या चा परिचय स्वरा सातुशे आणि साची शिंदे या विद्यार्थिनी करून दिला .

           दोन्ही पाहुण्यांना  श्रीफळ – पुष्प देऊन त्यांचा त्यांचे आभार विज्ञान शिक्षिका संगीता शिंदे यांनी व्यक्त केले .यावेळी आरोग्य भारतीचे संदीप धोंगडे – माधव नारायण कुंभोजकर यांच्यासह सागर ठाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते .या उपक्रमाच्या यशस्वी से साठी आदर्श प्रशालेचे  शिक्षक ए.के .देसाई , डी .पी सुतार , आर .बी . माने यांच्या यांनी विशेष परिश्रम घेतले .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…