
no images were found
सुट्टीदिवशी ही इस्टेट विभाग व नागरी सुविधा केंद्र सुरू
कोल्हापूर : महानगरपालिका इस्टेट विभागाने 14 एप्रिल 2024 अखेर 50 टक्के सवलत योजनेस जाहीर केली आहे. या सवलत योजनेचा लाभ जास्तीत जास्त गाळेधारकांना होण्यासाठी दि.14 एप्रिल 2024 अखेर इस्टेट विभाग व छत्रपती शिवाजी मार्केट येथील नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. उप-आयुक्त साधना पाटील यांनी इस्टेट विभागाच्या वसुलीसाठी इस्टेट विभाग व छत्रपती शिवाजी मार्केट येथील नागरी सुविधा केंद्र सुट्टीदिवशीही सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शनिवार दि.6 एप्रिल 2024 रोजी सुट्टीदिवशीही इस्टेट विभाग व छत्रपती शिवाजी मार्केट येथील नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार आहे. तरी गाळेधारकांनी दिनांक 14 एप्रिल 2024 पर्यंत 50 टक्के सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीन करण्यात आले आहे.