Home शासकीय महापालिकेच्यावतीने शहरात सेंट्रल वॉर रुम सुरु

महापालिकेच्यावतीने शहरात सेंट्रल वॉर रुम सुरु

4 second read
0
0
55

no images were found

महापालिकेच्यावतीने शहरात सेंट्रल वॉर रुम सुरु

कोल्हापूर (प्रतिनिधी):- पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढ होत असलेने महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात सेंट्रल वॉर रुम आजपासून सुरु करण्यात आला आहे.  महापालिकेने यापुर्वी अगिनशमन विभाग, चारही विभागीय कार्यालयामध्ये आपत्तीच्या काळात व्यवस्थापनेसाठी व पूर परिस्थितीच्या काळात नागरीकांच्या सोईसाठी मदत कक्ष सुरु केले आहे. यामध्ये विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान (0231-2622262), विभागीय कार्यालय क्रं.2 छ.शिवाजी मार्केट (0231-2543844), विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपूरी (0231-2521615), विभागीय कार्यालय क्रं.4 छ.ताराराणी मार्केट (0231-530011) या नंबरशी संपर्क साधावा. या मदत केंद्राबरोबर पंचगंगेची पाणी पातळी वाढत असल्याने नागरीकांच्या सोईसाठी मुख्य इमारतीमध्ये सेंट्रल वॉर रुम सुरु करण्यात आली आहे. या वॉर रूममध्ये 0231-2542601, 2545473 या दोन फोन नंबर्सवर नागरीकांनी आपल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. यामध्ये वादळ/पावसामुळे पडलेल्या झाडे उचलणे, स्थलांतरीत ठिकाणांची माहिती देणे, घराची पडझड झालेस त्याची माहिती देणे, स्थलांतरासाठी ठिकाणांची माहिती देणे व इतर पूराच्या अनुषंगीक मदतीसाठी हा वॉर रुम सुरु करण्यात आलेला आहे. तरी पूराच्या कालावधीमध्ये शहरातील नागरीकांनी या वॉर रुमशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …