Home राजकीय सगळीच तयार तर मग हद्दवाढीचं घोडं अडलंय कुठं- आपची  मागणी 

सगळीच तयार तर मग हद्दवाढीचं घोडं अडलंय कुठं- आपची  मागणी 

24 second read
0
0
75

no images were found

 

सगळीच तयार तर मग हद्दवाढीचं घोडं अडलंय कुठं- आपची  मागणी 

कोल्हापूर (प्रतिनिधी):-शहर हद्दवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. कोणत्याही शहरी पायाभूत सुविधा उपलब्ध न करता शहराच्या भोवती वाढत चाललेले नागरिकरण धोकादायक आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराची टप्याटप्याने हद्दवाढ करावी अशी आम आदमी पार्टीची भूमिका आहे. 

      उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ठरवले तर एका दिवसात हद्दवाढीची अधिसूचना निघू शकते. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी तर हद्दवाढ करा आणि मगच निधी मागण्यासाठी या असे वक्तव्य केले होते. मित्रा संस्थेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती केली असता ते देखील हद्दवाढीबद्दल सकारात्मक आहेत असे आ. राजेश क्षीरसागर यांचे म्हणणे आहे. सत्तेतील तिन्ही प्रमुख जर हद्दवाढ करायला हवी असे जर म्हणत असतील तर नेमकं घोडं अडलंय कुठं असा सवाल आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.

     राज्यातील सत्तेचा वाटेकरी असणाऱ्या एका प्रमुख पक्षाचे, ज्यांचे नेते स्वतः नगरविकास मंत्री आहेत अशा नेत्यांनीच निवडणुकीवर बहिष्काराची भाषा करणे हे हास्यास्पद आहे. त्यांनी थेट ना. एकनाथ शिंदेना भेटुन निवडणुकीपूर्वी हद्दवाढ करण्याबाबत आग्रह करणे आणि न ऐकल्यास कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी नगरविकास मंत्र्यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसण्याची भूमिका घेतली असती तर ती शहराच्या हिताची ठरली असती.

       शिवसेना (शिंदे गट) समन्वयक व स्थानिक आमदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत परस्पर विरोधी भूमिका घेतली. यातील नेमकी अधिकृत भूमिका कोणाची हे शहरातील मतदारांना त्यांनी सांगावे. सत्ता तुमची, नगर विकास मंत्री तुमचे तर मग एका पानाच्या अधिसूचनेसाठी एवढा ताकतुंबा का? आता ना. एकनाथ शिंदे यांनीच हा ताकतुंबा थांबवून हद्दवाढ करावी.

       प्रभाग रचना करण्याचे महापालिकेला आदेश आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार हद्दवाढी सारखा निर्णय निवडणुकीच्या सहा महिना आधी घ्यावा लागतो. हद्दवाढीच्या आड लपून फक्त कोल्हापूरची निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव असल्याचा आरोप करत निवडणुका बाकीच्या महापालिकांच्या सोबतच घ्याव्यात अशी भूमिका आप ने घेतली आहे.

     यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, विजय हेगडे, दुष्यंत माने, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयुर भोसले आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…