Home मनोरंजन समृद्धी केळकर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

समृद्धी केळकर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

6 second read
0
0
160

no images were found

समृद्धी केळकर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला

          स्टार प्रवाहच्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून कीर्तीच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनत्री समृद्धी केळकर लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची जबाबदारी समृद्धी केळकर पार पाडणार आहे. समृद्धी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

नव्या वर्षात हे नवं आव्हान स्वीकारताना समृद्धी म्हणाली, ‘मला सूत्रसंचलनाची आवड होती. मात्र संधी मिळाली नव्हती. जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाच्या निमित्ताने ही संधी चालून आली. मला हा नवा प्रयोग करताना अतिशय आनंद होत आहे. हे पर्व ज्युनियर्सचं अर्थातच ४ ते १४ या वयोगटातल्या चिमुकल्यांचं आहे. त्यामुळे या बच्चेकंपनीला संभाळत मला सूत्रसंचालन करायचं आहे. माझ्या करिअरची सुरुवात अश्याच एका डान्स रिऍलिटी शो ने झाली होती. रिऍलिटी शोमधून खूप गोष्टी शिकायला मिळतात. नृत्यावरचं माझं प्रेम सर्वांना ठाऊकच आहे. त्यामुळे  मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा मंच खूपच खास आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय थिरकायला लागतात. आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि फुलवा खामकर यांनी या कार्यक्रमात वेगळी रंगत आणली आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा १८ फेब्रुवारीपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…