no images were found
v
विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – केसरकर
कोल्हापूर : जयसिंगपूर शहर तसेच शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 8 व शाहूनगर परिसरात शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र दवाखान्याचे व जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते एसटी बसस्थानक या मार्गावर असणाऱ्या ओढ्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, उपअभियंता विजयसिंह बागवान, शाखा अभियंता पी.डी. राजपुत, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
येथील रेल्वे स्टेशन ते एसटी स्टँड रोडवरील दत्त मंदिर नजीक असणाऱ्या ओढ्यावर आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर व संजय पाटील- यड्रावकर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 81 लाख 42 हजार रुपये खर्चाचा नव्याने पूल बांधण्यात आला आहे. या पुलामुळे शहरासह रेल्वे स्टेशनच्या उत्तर बाजूला असणाऱ्या गावातील नागरिकांची वाहतूक सुलभ झाली आहे. या पुलाचे उद्घाटन, नागरी आरोग्यवर्धिनी सेवा केंद्र दवाखान्याचे उद्घाटन व गल्ली नंबर 4 दिगंबर जैन मंदिरा शेजारील पार्श्वनाथ चौकाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्यात चांगले काम सुरु असल्याचे मत पालकमंत्री श्री केसरकर यांनी व्यक्त केले.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी पी.सी. पाखरे, डॉ. पांडुरंग खटावकर, डॉ. स्मिता खंदारे, बांधकाम विभागाचे आप्पासाहेब मडिवाळ, रवींद्र माने, सतीश मलमे यांच्यासह बांधकाम व आरोग्य विभागातील अधिकारी, नगरपरिषद व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.