
no images were found
लेखक होण्यासाठी काल्पनिक व मानसिक विश्व निर्माण होणे खूप महत्त्वाचे– किरण गुरव.
कोल्हापूर : (प्रतिनिधी ) लेखनाच्या निर्मितीप्रक्रियेसंबंधी भूमिका मांडत असताना लेखक होण्यासाठी काल्पनिक व मानसिक विश्व निर्माण होणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे असे प्रतिपादन नामवंत लेखक किरण गुरव यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२३ निमित्त लेखक संवाद मालिकेचे आयोजन करण्यात आले होते या मालिकेअंतर्गत दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता भाषाभवन सभागृहात मराठीतील नामवंत लेखक मा. किरण गुरव यांच्याशी संवादक म्हणून मराठी विभागाचे प्रमुख मा. प्रा. नंदकुमार मोरे व मा. प्रा डॉ. रणधीर शिंदे यांनी संवाद साधला.याप्रसंगी लेखक किरण गुरव यांनी वाचन हे लेखकाचे पोषणमूल्य असते असे विचार मांडले. ग्रामजीवन, लोकसंस्कृती ,लोककला स्त्रीजीवन हेच माझ्या प्रयोगशील कथांचे आशय असून मानवी जगण्यातला संघर्ष, वेगाने बदलत जाणारा काळ ही लेखनाची बलस्थाने आहेत. हे महत्त्वपूर्ण विचार मांडले. याप्रसंगी, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे प्रमुख मा.प्रा. डॉ अवनीश पाटील उपस्थित होते. मिरज महाविद्यालयातील मराठी विभागातीलप्रा. अविनाश भोरे, प्रा. निलम पाटील,विलिंग्डन महाविद्यालयातील प्रा. सुवर्णा जाधव,प्रा. वैशाली औताडे,घाळी महाविद्यालयाचे प्रा. दत्ता पाटील, महावीर महाविद्यालयाचे प्रा. गोमटेश्वर पाटील व प्रा. शरद गायकवाड,,द. न्यू. कॉलेजचे प्रा. गुंडोपंत पाटील,बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते, तसेच मराठी विभागातील संशोधक विद्यार्थी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.