no images were found
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वॉर्डसभांद्वारे नागरीकांमध्ये जनजागृती
कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नागरीकांमध्ये जनजागृसाठी शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान अंतर्गत प्र.क्र.55 पदमाराजे उदयान परिसर, प्र.क्रं 56 शहाजी उद्यान, प्र.क्रं.69 तपोवन, प्र.क्रं.70 मधील वीर सावरकर विद्यालामध्ये, प्र.क्र.75 साळोंखेनगर येथे हर घर तिरंगाबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी उपशहर अभियंता एन.एस.पाटील, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवासंबंधी शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे जवाहरनगर हायस्कूलमध्ये ध्वज संहिताचे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना करण्यात आले. तसेच शाळेच्या माध्यमातून पालक भेटीचे आयोजन करून तिरंग्याचे महत्व व हर घर तिरंगा या उपक्रमासाठी प्रबोधन करण्यात आले. यावेळी तेलवेकर सर, सौ.भास्कर व शिक्षक उपस्थित होते.