no images were found
फ्लिपकार्टने समर्थ उपक्रमाअंतर्गत उत्तर प्रदेश सरकारच्या
वाराणसी जिल्हा प्रशासनासोबत केला सामंजस्य करार
या भागीदारीतून एमएसएमई, विणकर, हस्तकलाकार आणि दिव्यांग व्यक्तींना क्षमता उभारणीत साह्य होईल आणि भारतातील वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे लाभही मिळतील
वाराणसी : फ्लिपकार्ट या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स बाजारपेठेने उत्तर प्रदेश सरकारच्या वाराणसी जिल्हा प्रशासनासोबत सामंजस्य करारावर सह्या केल्याची घोषणा आज केली. वाराणसीतील कारागीर, विणकर आणि दिव्यांगांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
या भागीदारीच्या माध्यमातून बनारसी साड्या, हाताने बनवलेले गालिचे, जरदोजी क्राफ्ट, धातूच्या वस्तू आणि हाताने बनवलेली दरी अशा या राज्यातील लोकप्रिय वस्तू आता फ्लिपकार्ट व्यासपीठावरील ४०० दशलक्ष ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. फ्लिपकार्ट समर्थ उपक्रमातून प्रशिक्षण आणि सुरुवातीला ठराविक कालावधीसाठी पाठबळही दिले जाईल. त्यामुळे कारागीर, विणकर, दिव्यांग आणि हस्तकलाकारांना ई-कॉमर्सच्या माध्यमातून आपला व्यवसाय अधिक वृद्धिंगत करता येईल.
वाराणसीत पार पडलेल्या कार्यक्रमात भारताचे माननीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री श्री. भानू प्रताप सिंग वर्मा यांच्या उपस्थितीत वाराणसी विभागातील उद्योग विभागाचे सहआयुक्त श्री. उमेश कुमार सिंग आणि फ्लिपकार्ट ग्रूपचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर श्री. रजनीश कुमार यांनी या करारावर सह्या केल्या.
उत्तर प्रदेशचे माननीय नोंदणी आणि मुद्रांक मंत्री श्री. रविंद्र जैस्वाल यांच्यासोबत एमएसएमई, माहिती, खादी आणि आयात विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. नवनीत सेहगल, वाराणसीचे विभागीय आयुक्त श्री. दीपक अग्रवाल आणि वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी श्री. कौशल राज शर्मा आदी मान्यवर अतिथी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात वाराणसीतील कारागीर, विणकर, दिव्यांग व्यक्ती आणि हस्तकलाकारांचा समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.