no images were found
सोनी सबवरील कलाकार सांगत आहेत यंदाच्या धनत्रयोदशीसाठी ते काय तयारी करत आहेत
धनत्रयोदशीपासून दिवाळीचे पर्व सुरू होते. धनत्रयोदशीहे आध्यात्मिक विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या मंगल दिनी शुभ मुहूर्तावर केलेली खरेदी लाभते आणि पुढील वर्षभर सुखसमृद्धी घेऊन येते असे म्हणतात. सोनी सबचे कलाकार सांगत आहेत, यंदाच्या धनत्रयोदशीसाठी त्यांची तयारी कशी सुरू आहे आणि यावेळी काय खरेदी करण्याचा त्यांचा विचार आहे.
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका करणारी प्राची बंसल म्हणते, “धनत्रयोदशीच्या दिवशी काय काय खरेदी करायची हे माझी आई बघते. पण आता काही काळापासून मी एकटी राहात आहे, त्यामुळे मी पूजा करण्याचे ठरवले आहे. शूटिंगमधून मला वेळ मिळाला की माझ्या आई-वडीलांसाठी मी काही तरी घेऊन येते. मी माझ्यासाठी कधीच खरेदी केलेली नाही आणि यावर्षीही वेळ मिळाला की माझ्या आईसाठी नवीन भांडी आणि सोने घेऊन येणार आहे.”
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्तीची भूमिका करणारी गरिमा परिहार म्हणते,“दरवर्षी धनत्रयोदशीला आम्ही सर्वसामान्यपणे सोन्याची खरेदी करून लक्ष्मीचे स्वागत करतो. पण यावर्षी, काही तरी वेगळे आणि रोमांचक करून दिवाळीची सुरुवात करायची असे मी ठरवले आहे- नवीन कार! सणासुदीची सुरुवात होत आहे आणि मला खात्री आहे की पुढचा प्रवास सुंदर असणार आहे. नवीन परंपरांचे स्वागत करून दिवाळीचा आनंद आणि उल्हास साजरा करण्यासाठी मी आतुर आहे.”
‘बादल पे पांव है’ मालिकेत शिल्पा खन्नाची भूमिका करणारी मानसी शर्मा म्हणते,“या धनत्रयोदशीला चांदीचे तबक घेणे मला महत्त्वाचे वाटते आहे, कारण त्याच्यामुळे पवित्रता आणि सद्भाग्य लाभते. आपल्या परंपरेत चांदीचे विशेष स्थान आहे. धार्मिक विधींमध्ये चांदीची भांडी वापरल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात. यावर्षी माझ्याकडच्या वस्तूंमध्ये मी एक सुंदर भर घालणार आहे. ती वस्तू अशी काही खास आहे की, ती केवळ या आनंदी पर्वाचा एक भाग नसेल, तर या सणाचा आनंद आणि सकारात्मकता यांचे भान ती मला देत राहील!”
‘बादल पे पांव है’ मालिकेत पूनम खन्नाची भूमिका करणारी शेफाली राणा म्हणते, “धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते. आपण आपल्या घरात सुख समृद्धीच्या स्वागतासाठी सज्ज होतो. घर सुशोभित करण्यासाठी दारापुढे सुंदर, रंगीत रांगोळी काढतो, प्रकाश आणि ऊब देणाऱ्या पणत्या, दिवे लावतो, रंगीबेरंगी तोरणे लावून घर सजवतो आणि आनंद आणि उत्साहाने हा सण साजरा करतो. नवीन कपडे, दागदागिने विशेषतः सोने खरेदी करतो, जे सद्भाग्य घेऊन येते असे आपण मानतो. घराची सफाई करण्यापासून ते पूजा करण्यापर्यंत प्रत्येक बारीक सारिक गोष्ट आपण आनंदाने आणि सकारात्मकतेने करतो आणि पुढच्या काळासाठी ऊर्जा मिळते.”