Home शासकीय केरळ मध्ये आता शाळेत ‘सर’, ‘मॅडम’ नव्हे तर ‘टिचर’ म्हणायचं

केरळ मध्ये आता शाळेत ‘सर’, ‘मॅडम’ नव्हे तर ‘टिचर’ म्हणायचं

0 second read
0
0
147

no images were found

केरळ मध्ये आता शाळेत ‘सर’, ‘मॅडम’ नव्हे तर ‘टिचर’ म्हणायचं

तिरुअनंतपुरम : केरळ राज्यातील सर्व शाळेतील शिक्षकांना ‘सर’ किंवा ‘मॅडम’ ऐवजी ‘टीचर’ म्हणून संबोधावे निर्देश राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (केएससीसीपीसीआर) शाळांना निर्देश दिलेत आहे.
“सर” आणि “मॅडम” सारख्या शब्दांनी हाक मारणे टाळणे असं केएससीसीपीसीआरच्या आदेशात नमूद केले आहे. पॅनेलचे अध्यक्ष के. व्ही. मनोजकुमार आणि सदस्य सी. विजयकुमार यांच्या पॅनलने बुधवारी सामान्य शिक्षण विभागाला राज्यातील सर्व शाळांमध्ये टिचर हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले.
सर किंवा मॅडम याऐवजी ‘टिचर’ म्हटल्यास सर्व शाळांमधील मुलांमध्ये समानतेची भावना रुजवण्यास मदत होते आणि शिक्षकांविषयीची त्यांची ओढही वाढू शकते, असेही बालहक्क आयोगाने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना त्यांच्या लिंगानुसार ‘सर’ आणि ‘मॅडम’ म्हणणे बंद करून भेदभाव संपवण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीच्या याचिकेवर विचार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…