
no images were found
अंजलीला फरफटत नेल्याप्रकरणी दिल्लीतील दोन पोलिस सब इन्स्पेक्टरसह ११ पोलिस निलंबित
नवी दिल्ली : येथील कंझावला केसमध्ये अंजली या तरुणीला कारखाली १३ किलोमीटर फरफटत नेलं होतं. तिच्या शरीरावरील संपूर्ण कपडे निघाले होते, मांसदेखील खरवडून निघालं होतं. या प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घातल्यानंतर ११ पोलिस निलंबित झालेले आहेत. निलंबित करण्यात आलेले पोलिस कर्मचारी रोहिणी जिल्ह्यातले आहेत. यामध्ये दोन पोलिस सब इन्स्पेक्टर निलंबित झालेले आहेत तर चार असिस्टंट सब इन्स्पेक्टर आणि पाच कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आलेले आहेत.
१ जानेवारी रोजी पहाटे घटना घडली तेव्हा सहा पीसीआर ड्युटीवर होते. निलंबित पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.ज्या रस्त्याने अंजलीला फरफटत नेलं त्या रस्त्यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहेत. दिल्लीच्या कंझावालामध्ये 1 जानेवारीच्या पहाटे एका तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला होता. शरीराचे बरेचसे भाग फरफटत नेल्यानं तुटले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार ५ तरुण भरधाव वेगानं कार चालवत होते. त्यांनी संबंधित तरुणी स्कूटरवरुन जात असताना तिला धडक दिली. त्यानंतर तिला १३ किमीपर्यंत फरफटत नेलं. ज्यात तिचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणानन्तर दिल्लीत प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.