no images were found
३१ जानेवारी ते ६ एप्रिलपर्यंत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार
नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झालं आहे. ३१ जानेवारी ते ६ एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे शेवटचं बजेट सेशन असणार आहे त्यामुळं मोदी सरकारसाठी ते महत्वाचं ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर यामध्ये अनेक महत्वाच्या आणि मोठ्या घोषणाही होण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी याची घोषणा केली.
यापूर्वी गेल्या महिन्यात पार पडलेलं हिवाळी अधिवेशनात अनेकदा गोंधळ झाल्यानं हे अधिवेशन वेळेपूर्वीच गुंडाळण्यात आलं होतं. यामुळं अनेक विषयांवरील चर्चाही अपूर्ण राहिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. पण आता पुढील बजेटचं अधिवेशन हा महिन्याभराहून अधिक काळ सुरु राहणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचं मोदी सरकारचं हे शेवटचं बजेट अधिवेशन असल्यानं यामध्ये अनेक महत्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता आहे.
३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी पहिल्या टप्पा असेल त्यानंतर १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या काळात या अधिवेशनावर चर्चा होतील.हिवाळी अधिवेशन वेळेपूर्वीच गुंडाळण्यात आल्यानं विरोधकांनी वारंवार चर्चेचा आग्रह धरुनही भारत-चीन सैनिकांमध्ये ९ डिसेंबर रोजी तवांगमध्ये झालेल्या संघर्षावर चर्चा होऊ शकली नव्हती. युक्रेन युद्धानंतर महागाईत झालेली वाढ तसेच जागतीक बँक आणि आयएमएफनं या वर्षात आर्थिक मंदीचा दिलेला इशारा यावरही या अधिवेशनात चर्चा होऊ शकते.