no images were found
सुषमा स्वराज यांनी संसदेत जोशीमठची भविष्यवाणी २०१३ मध्येच केली होती
नवी दिल्ली : २०१३ मध्ये केदारनाथमध्ये महापूर आला होता. या नंतर लोकसभेत सुषमा स्वराज यांनी भाषण दिले होते. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी भाषणात उत्तराखंडच्या पर्यावरण-संवेदनशील प्रदेशातील विकास आणि विनाश या मुद्द्यांवर देशाचे लक्ष वेधले होते.केदारनाथ दुर्घटनेनंतर सुषमा स्वराज यांनी संसदेत पर्यावरणाचा होणाऱ्या विनाशाचा मुद्दा उपस्थित केला होता.
यावेळी सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होती. त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “उत्तराखंडमध्ये विकासाच्या नावाखाली सुरू स्पर्धा सुरु आहे. निसर्गाशी छेडछाड करणे, पर्यावरण प्रदूषित करणे, नद्यांवर धरणे बांधणे, याचा परिणाम आहे.(महापूर, भूस्खलन) विकास आणि विनाश असं समीकरण तयार झाले आहे. मात्र हा विकास कोणासाठी करायचा?, आम्ही कोट्यवधींचा विकास आम्ही करत आहोत. मात्र एक दिवस निसर्ग कोपतो आणि एवढा विध्वंस करतो की सर्व काही उद्ध्वस्त करतो. आपले डोळे कधी उघडणार? या दुर्घटनेनंतरही आपले डोळे उघडणार नाहीत का?”, असा प्रश्न सुषमा स्वराज यांनी उपस्थित केला होता. देशात डोंगर खोदून विकास सुरु आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकर यांनी २०२४ अखेरीस आपल्या रस्त्यांची पायाभूत सुविधा अमेरिकेसारखी असेल, असे वक्तव्य केले. मात्र हा विकास करताना आपण निसर्गाला नष्ट करतोय का?, असा प्रश्न सुषमा स्वराज यांच्या भाषणावरुन उपस्थित होतो.
दरम्यान, जोशीमठ सारखी परिस्थिती आपण केदारनाथ मध्ये देखील अनुभवली होती. तरी देखील निसर्गाचे संवर्धन करणे, आपण शिकलो नाही. सरकारचे निर्णय यात महत्वाची भूमिका निभवतात. मात्र निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सरकारचे आळशी धोरण आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो, असाच प्रकार सध्या जोशीमठ मध्ये घडला आहे. उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या समस्येवर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने प्रसिद्ध केलेल्या ताज्या छायाचित्रानुसार लोकांच्या चिंतेत वाढ केली आहे. जोशीमठ १२ दिवसात ५.४ सेमी खचला आहे.लोकांचे जगणे कठीण झाले आहे. घर, दवाखाना, दुकानांना भेगा पडत आहेत.