
no images were found
कलाकारांनी मकर संक्रांतीनिमित्त सांगितल्या पतंग उडवण्याच्या त्यांच्या प्रेमळ आठवणी
पतंगाचा उत्सव म्हणून ओळखला जाणरा सण मकर संक्रांती भारतभर जल्लोषात साजरा केला जातो. लोक पतंग उडवत वसंत ऋतूच्या आगमनाला साजरे करतात. यंदा एण्ड टीव्हीवरील कलाकार आयुध भानुशाली (कृष्णा, ‘दूसरी मॉं), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाभी, ‘भाबीजी घर पर है’) या शुभ सणानिमित्त पतंग उडवण्याचे त्यांचे अनुभव व आठवणींबाबत सांगत आहेत. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्ये कृष्णाची भूमिका साकारणारा आयुध भानुशाली म्हणाला, ‘‘मी गुजराती कुटुंबामधील आहे आणि आम्ही मकर संक्रांतीची आतुरतेने वाट पाहत असतो. गुजरातमध्ये या सणाला उत्तरायण म्हणतात. या सणाची खासियत म्हणजे प्रसिद्ध ‘पतंग बाजी’, जेथे इतर पतंगांना कापण्यासाठी पतंगाचा मांजा खरखरीत केला जातो. गुजरातमध्ये उत्तरायणाची तयारी डिसेंबरपासून सुरू होते. लोक हिवाळी भाज्यांपासून बनवले जाणारे उंधीयू, तीळ, शेंगदाणे व गुळापासून बनवली जाणारी चिक्की आणि या सणाच्या दिवशी सेवन केल्या जाणाऱ्या इतर खास पाककलांचा आस्वाद घेण्यास सुरूवात करतात. माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.’’
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये दरोगा हप्पू सिंगची भूमिका साकारणारे योगेश त्रिपाठी म्हणाले, ‘‘भारतभरात मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो, पण मला सांगावेसे वाटते की उत्तरप्रदेशमध्ये पतंग उडवणे हा वर्षभर आनंद घेतला जाणारा खेळ आहे. उत्तरप्रदेशमध्ये मकर संक्रांती सण मोठ्या भक्तीसह साजरा केला जातो. अनेक लोक गंगा घाटला भेट देऊन पवित्र स्नान करतात आणि त्यानंतर ‘दही-चुरा’(दही व ताजा भात) सेवन करत दिवसाची सुरूवात करतात.हिरवेवाटाणे, तांदूळआणिमोसमीभाज्या घालून खास खिचडी बनवली जाते,ज्याची चव स्वादिष्ट असते. मी वर्षभर या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतो. माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.’’एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणाऱ्याशुभांगी अत्रे म्हणाल्या, ‘‘मकर संक्रांतीदरम्यान आमचे संपूर्ण कुटुंब माझे मूळगाव इंदौरमध्ये एकत्र येतात. आम्ही खास सणाचा भोजन संक्रांत भोज तयार करतो. आम्ही गरीबांना तिळगूळाचे लाडू, फळे, ड्राय खिचडी इत्यादी सारखे लहान गिफ्ट्स देखील देतो. मी पतंग उडवण्याचा खूप आनंद घेते. आम्ही स्पर्धेचे आयोजन करतो, ज्यामध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन खूप धमाल करतो. आमच्यासाठी पतंग हरवलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी प्रेरणा व आशेचे प्रतीक आहे. मकर संक्रांती सणादरम्यान संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण असते. माझ्याकडून सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!’