
no images were found
हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरळीतपणे पार
शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर-२०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. ०२ जानेवारी, २०२३ पासून व्यवस्थितपणे सुरु झालेल्या आहेत.
दि.११ जानेवारी, २०२३ रोजी B.A.,B.Tech.,M.Com, M.Sc., B.Pharm, M.A.,B.Sc., B.E.,M.C.A., M.S.W.,M.A.(Geography), B.Sc.M.Sc.Nanoscience& Technology, B.A. (Dress Making and Fashion Co-ordination), B.I.D., Bachelor of Design,M.B.A.,B.S.W.,M.A.(Mass Communication & Journalism) , B.Voc.(Food Processing Technology),Master of Journalism, M.Sc.(Technology), B.Voc. Agriculture, B.Voc.(Sustainable Agriculture),B.Voc.(Food processing & Mgt.),Master of Laws,B.Voc.(Nursing), B.Voc. in Automobile , M.Arch.,
B.Voc.(printing and Publishing), M.A.-Dramatics, B.Voc.(Retail and Management and I.T.) Master of fine Art (Music),M.Arch.(General), Bachelor of Arts Defence Study, B.Voc.(Horticulture Science and Technology), B.Sc.(Food Science), Master of Arts Music (Vocal and Instrumental Music), Master of Arts in Women;s Studies, B.Voc.(Sustainable Agriculture and Management), B.Voc.(Tourism and service Industry), M.A.(BhashaProdyogiki), M.A.(Home Science),M.Com.(Valuation of Real Estate)Bachelor of Arts & Bachelor of Education. अशा एकूण ४४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा वर्णनात्मक (offline) पध्दतीने विविध महाविद्यालये व अधिविभागामध्ये सुरळीतपणे पार पडल्या.
या परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणा-या विद्यार्थ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारीपथके स्थापन केली आहेत. सदर पथकाकडून परीक्षेत गैरप्रकारकरणा-या विद्यार्थ्यांवर गैरप्रकार म्हणून प्रत्यक्ष नोंद करुन परीक्षा प्रमाद समितीमार्फत नियमानुसार कारवाई विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे. तसेच परीक्षेचे पावित्र्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच परीक्षा द्यावी, असे आवाहन मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी केले आहे.