Home शैक्षणिक डीकेटीई येथे प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

डीकेटीई येथे प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

2 second read
0
0
31

no images were found

डीकेटीई येथे प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

इचलकरंजी (प्रतिनिधी):  डीकेटीई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त डीकेटीईच्या प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी डीकेटीईचे आमचे दादा कार्यक्रम समिती व एनएसएस विभाग आणि अथायु मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबीरात ३०० हून अधिक स्टाफवर मोफत रोगनिदान करण्यात आले. यासोबत दादांच्या वाढदिवसानिमित्त स्टाफसाठी हाफ पिज क्रिकेट स्पर्धा देखील मोठया दिमाखात संपन्न झाले त्यावेळी दादांनी प्रत्यक्षात येवून क्रिकेट स्पर्धेस शुभेच्छा दिल्या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या डायरेक्टर प्रा. डॉ. सौ. एल.एस. अडमुठे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. संस्थेच्या मानद सचिव डॉ सौ. सपना आवाडे यांनी शिबीरास भेट देवून सर्वांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या डायरेक्टर, प्रा. डॉ. अडमुठे यांनी दादांच्या वाढदिवानिमित्त राबविण्यात आलेल्या शिबीरामध्ये संस्थेच्या वतीने दादांना दिर्घायुष्य लाभो यासाठी मनोकामना व्यक्त केल्या.  यावेळी डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, सोशल डीन व एनएसनएस विभागप्रमुख सचिन कानिटकर, सर्व डिन्स, सर्व विभागप्रमुख यांचेसवे अथायु मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, कोल्हापूर यांचे डॉ. सुरज पालकर, सुलक्षणा बिराजदार, डॉ शशिकांत कुुंभार सवे अथायु हॉस्पिटलची संपूर्ण टीम उपस्थित होती.
या शिबीरामध्ये इसीजी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, वजन, प्रोस्टेट, लघवीची धार तपासणे, गुडघे दुखी, डोळे तपासणे अशा अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या त्याचबरोबर यावेळी उपस्थितांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाला. या शिबीराच्या आयोजना बद्दल सर्व स्टाफनी समाधान व्यक्त केले. प्रा.सुयोग रायजाधव, शिवाजी लोहार यांनी संयोजन प्रतिनीधी म्हणून काम पाहिले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी राहूल जगताप, प्रितम पाटील, विजय भोपे यांच्यासवे सर्वांनी परिश्रम घेतले.  
फोटो ओळी – डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे यांच्या वाढविसानिमित्त भरविण्यात आलेल्या शिबीरात आरोग्य तपासणी करीत असताना डीकेटीईचे कर्मचारी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…