no images were found
सांगलीत श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळा बुधवारपासून
सांगली : सांगलीत श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळा समितीच्यावतीने कल्पद्रुप क्रीडांगण येथे श्रीराम कथा व नाम संकीर्तन सोहळा रंगणार आहे. ४ ते १४ जानेवारी अखेर हा सोहळा चालणार असून ह. भ. प. श्री समाधान शर्मा (बीड) हे दररोज मराठीतून रामकथा सांगणार आहेत. तसेच या निमित्ताने भव्य कलश यात्रा, शोभायात्रा, ध्वजारोहण, ज्ञानयज्ञ, प्रवचन, किर्तन, आरोग्य शिबीर आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी कार्याध्यक्ष मनोहर सारडा श्रीकांतजी शिंदे तात्या, मालू शेठ, युवा नेते सारडा, बाळासाहेब पाटील अनेक उद्योजक व मान्यवर, रतनलाल सारडा, ओमप्रकाश सारडा,महीला आदी उपस्थित होते.
सारडा म्हणाले, नेमिनाथ नगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर अयोध्या नगरीमध्ये हा सोहळा रंगणार आहे. याचे उद्घाटन बुधवार ४ रोजी ध्वजारोहणाने होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी भिडे गुरुजी, प. पू. झेंडे महाराज, प. पू. कोटणीस महाराज, प. पू. केळकर महाराज, प. पू. तुषार भोसले, प. पू. शिवलिंग शिवाचर्य स्वामी, गणेश गाडगीळ, श्रीपाद चितळे, रावसाहेब पाटील, नरेंद्रभाई जानी हे उपस्थित राहणार आहेत. याचे यजमानपद ह. भ. प. श्री राम व विश्वास गवळी यांना लाभणार आहे. तर राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, विनोद घोडावत, नितीन झंवर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम पूर्ण भारतभर जाईल व त्याची नोंद होईल असा मानस आहे. सर्व देशभर हिंदूंचा माहोल आहे . शोभा यात्रेत अनुशासन ,शिस्त पालन करून,ही शोभायात्रा नियोजनबद्ध, होण्यासाठी नियोजनाची माहिती व्हाट्सअप ग्रुप वरून पाठवण्यात येईल.
गुरुवार ५ रोजी शहरातील राममंदिर ते कल्पद्रुम क्रीडांगणापर्यंत भव्य कलश व शोभा यात्रा काढण्यात येणार जाहे. यावेळी उंट, घोडे, वादयांच्या गजरात १००० हून अधिक टाळकरी व नागरिक पारंपारिक वेषात उपस्थित राहणार आहेत. ५ रोजीपासून दररोजच्या रामकथेस प्रारंभ होणार आहे. तसेच १४ रोजीपर्यंत दररोज किर्तनही होणार आहे.समाधान शर्मा महाराज यांचे प्रवचन ही होणार आहे. सांगली, कोल्हापुरातील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. हिंदू समाजाला रामचंद्र माहित व्हावे, प्रभू रामचंद्रांचे विचार अंतकरणात यावेत यासाठी हा सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त भाविकांनी व सांगलीच्या शेजारील इतर शहराने सुद्धा या नाम किर्तन सोहळ्यात सहभाग घेऊन . शोभा यात्रेत सहभागी व्हावे. यासाठी आज नेमिनाथ नगर ग्राउंड वर तातडीची बैठक आयोजित करण्यात आली .