no images were found
चंद्राबाबुंच्या रोड शोमधील चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेश (जि. नेल्लोर) येथील कंदुकुरला मध्ये तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांचा रोड शो सुरु असताना झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यु झाला आहे.
आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरला येथे तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शो दरम्यान ही दुर्घटना घडली आहे.
कंदुकुरला येथे चंद्राबाबूंनी कंडुकुरमध्ये रोड शो आणि जाहीर सभेचे नेतृत्व केलं. या कार्यक्रमासाठी तेलुगू देसम पक्षाचे नेते तसेच कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. दरम्यान स्थानिक लोकांनीही यात सहभाग घेतल्यामुळे गर्दी आणखीच वाढली. या गर्दीस उपलब्ध रस्ते अपुरे होते. प्रचंड प्रमाणात असलेल्या गर्दीसाठी जागा अपुरी पडल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती अनियंत्रित होत होत गोंधळ मजला. झालेल्या चेंगराचेंगरीमुळे काही लोक रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात पडून बेशुद्ध झाले तर काहीजण जखमी झाले. जखमी व बेशुद्ध लोकांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले परंतू यातील ८ जणांचा मृत्यू झाला असून अन्य ५ जण जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या तसेच जखमी झालेल्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत चंद्राबाबू यांनी स्वत: जाहीर केली आहे. सभेतून थेट रुग्णालयास भेट देऊन चंद्राबाबू यांनी जखमींचे व मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वनही केले. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या लोकांवर चांगले उपचार करण्यातचे आदेशही त्यांच्याक्डून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रति कुटुंब 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. मृतांच्या पार्थिवावर पक्षाकडून अंत्यसंस्कार करण्यात येणार असून अपघातग्रस्त कुटुंबातील मुलांना एनटीआर ट्रस्टच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण दिले जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.