Home राजकीय सकल हिंदू समाजाच्या वतीने 1 जानेवारीला ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरण आणि गोहत्या विरोधी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

सकल हिंदू समाजाच्या वतीने 1 जानेवारीला ‘लव्ह जिहाद’, धर्मांतरण आणि गोहत्या विरोधी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

5 second read
0
0
173

no images were found

सकल हिंदू समाजाच्या वतीने 1 जानेवारीला लव्ह जिहाद’, धर्मांतरण आणि गोहत्या विरोधी हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

कोल्हापूर :  महाराष्ट्रातील हिंदू तरुणी श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केल्यानंतर ते प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील रूबिका पहाडन या हिंदू तरुणीचे 50 तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अशा एक-दोन घटना नसून असंख्य घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. ही वेळ आपल्या मुलींवर येऊ नये तसेच दुसरीकडे देशात छळ-बळ-प्रलोभन दाखवून हिंदूंचे वाढते धर्मांतरण नव्या राष्ट्रांतराला जन्म देऊ शकते. हे राष्ट्रघातकी ‘धर्मांतरण’ आणि ‘लव्ह जिहाद’ तसेच गोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, 1 जानेवारी 2023 रोजी बिंदू चौक परिसरातून सकाळी 10 वाजता ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. हा मोर्चा माधुरी बेकरी बिंदू चौक येथून प्रारंभ होणार आहे. यानंतर मिरजकर तिकटी, महाद्वार रस्ता, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भवानी मंडप येथे समाप्ती होईल. या मोर्च्यात कोल्हापूर जिल्ह्यातून संत, धर्माचार्य, संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना आणि विविध ज्ञाती समाज सहभागी होणार आहेत अशी माहिती जनआक्रोश मोर्चा समितीच्या वतीने देण्यात दिली.

या संदर्भात कोल्हापूर येथील हिंदू एकता कार्यालय येथे संयुक्त हिंदुत्ववादी संघाच्या वतीने आयोजित बैठकीला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्‍व हिंदु परिषद बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, सेवाव्रत प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, हिंदू एकता, हिंदू महासभा आदी विविध संघटना, तरुण मंडळांचे प्रतिनिधी तसेच धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संपूर्ण कोल्हापुरात मोर्चाविषयी चालू असलेले संपर्क आणि जागृती अभियान यांचा आढावा मांडण्यात आला. तसेच या मोर्च्यायाद्वारे हिंदूंचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येकाने ‘अभी नहीं, तो कभी नहीं’ हा निर्धार करून अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. अशा बैठका प्रत्येक संघटना घेत आहे.

या निमित्ताने कोल्हापूरमधील वाहनांवर पत्रके चिटकवणे, हस्तपत्रकांचे वितरण करणे, प्लेक्स फलक लावणे, होर्डिंग्ज लावणे, प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी व्हिडिओ क्लिपद्वारे सोशल मीडियावरून आवाहन करणे तसेच कोल्हापूरातील मराठा, राजपूत, जैन, ब्राह्मण, खाटिक, शिंपी, आर्य क्षत्रिय, कोष्टी, गवळी, बौद्ध, वीरशैव आदी विविध समाजाच्या वा संघटनांच्या प्रमुखांना भेटून त्या त्या समाजात जागृती केली जात आहे. तर ठिकठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमांत जाऊन सर्वांना मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.  

Load More Related Articles

Check Also

तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह देसाई.

  तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह …