Home मनोरंजन दिल दियॉं गल्‍लॉं’मध्‍ये दिलप्रीतला अमृता त्‍याची नात असल्‍याचे समजेल का?

दिल दियॉं गल्‍लॉं’मध्‍ये दिलप्रीतला अमृता त्‍याची नात असल्‍याचे समजेल का?

1 min read
0
0
262

no images were found

दिल दियॉं गल्‍लॉंमध्‍ये दिलप्रीतला अमृता त्‍याची नात असल्‍याचे समजेल का?

सोनी सबवर नुकतेच सुरू झालेली ‘दिल दियॉं गल्‍लॉं’स्‍थलांतराच्‍या परिणामांमुळे वेगळे झालेल्‍या कुटुंबाबाबतची हृदयस्‍पर्शी मालिका आहे. या मालिकेमध्‍ये कुटुंबातील सदस्‍यांमधील अनेक न व्‍यक्‍त केलेल्‍या भावना पाहायला मिळतात. मालिकेच्‍या सुरूवातीच्‍या एपिसोड्समध्‍ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले की, अमृता (कावेरी प्रियम) परदेशातून भारतात येते आणि तिला माहित नसते की दिलप्रीत ब्रार (पंकज बेरी) तिचे आजोबा आहेत. ती त्‍यांनाच भेटते.

अमृता तिच्‍या वडिलांना इंडोनेशियाला जात असल्‍याचे खोटे सांगत तिच्‍या प्रकल्‍प कामासाठी भारतात येते. ती भारतात जात आहे हे माहित असलेला तिचा मित्र आदित्‍य तिला विचारतो की, ती तिच्‍या आजोबांशी गाठभेट झाली तर काय करेल. प्रत्‍युत्तर देत अमृता म्‍हणते की, ती तिच्‍या आजोबांना कधीच भेटणार नाही. अमृता तिच्‍या वडिलांचा स्‍वीकार न करण्‍यासाठी आणि वडिलांना दूर करण्‍यासाठी आजोबांचा तिरस्‍कार करते. या घटनेने तिचे मन दुखावले असल्‍यामुळे तिची स्‍वत:च्‍या आजोबांना कधीच न भेटण्‍याची इच्‍छा आहे. नियती आपला डाव खेळते, अमृता पंजाबमध्‍ये येते आणि दिलप्रीत व संजोत राहत असलेल्‍या ‘पिंड’मध्‍ये पोहोचते. वास्‍तविकतेबाबत माहित नसलेल्या अमृताचा दिलप्रीतशी आमनासामना होतो. दिलप्रीतला अमृताशी भेटल्‍यानंतर तिच्‍याशी नाते असल्‍याची चाहूल लागेल का? दिलप्रीत व अमृता यांना एकमेकांमध्‍ये असलेले नातेसंबंध माहित नसताना त्‍यांच्‍यामध्‍ये कशाप्रकारचे नाते निर्माण होते हे पाहणे रोचक असणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…