no images were found
राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 रत्नागिरी ते नागपूर महामार्ग चौपदरीकरण
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम वाटपाकरिता गावनिहाय शिबीराचे आयोजन
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 रत्नागिरी ते नागपूर विभागा (आंबा ते चोकाक) च्या चौपदरीकरणासाठीचे संपादन कामकाज चालू असून त्याबाबतच निवाडे पूर्ण झाले आहेत. या महामार्गामध्ये जमीन संपादित झालेल्या शेतकरी खातेदार यांना नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्याकरिता गावनिहाय शिबीर आयोजित करण्यात आले असून सर्व गावांमधील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात हजर रहावे, असे आवाहन सक्षम प्राधिकारी तथा भूसंपादन क्र. 6 चे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी केले आहे.
गावनिहाय शिबीर याप्रमाणे-
सोमवार, दि. 26 डिसेंबर 2022 रोजी बोरपाडळे (पन्हाळा), आंबवडे (पन्हाळा), पिंपळे तर्फ सातवे (पन्हाळा), दाणेवाडी (पन्हाळा).
मंगळवार, दि. 27 डिसेंबर 2022 रोजी कुशिरे तर्फ ठाणे (पन्हाळा), केर्ली (करवीर), वडगांव (हातकणंगले), चोकाक (हातकणंगले)
बुधवार, दि. 28 डिसेंबर 2022 रोजी चांदोली (शाहुवाडी), वारुळ (शाहुवाडी), निळे (शाहुवाडी), आंबा (शाहुवाडी)
गुरुवार, दि. 29 डिसेंबर 2022 रोजी चरण (शाहुवाडी), डोणोली (शाहूवाडी), आवळी (पन्हाळा), पैजारवाडी (पन्हाळा)
शुक्रवार, दि. 30 डिसेंबर 2022 रोजी नागांव (हातकणंगले), माले (हातकणंगले), टोप (हातकणंगले). हेर्ले (हातकणंगले)
शनिवार, 31 डिसेंबर 2022 रोजी पडवळवाडी (करवीर), केर्ले (करवीर), निगवे दुमाला (करवीर), जाठारवाडी (करवीर)
सोमवार दि. 2 जानेवारी 2023 रोजी करुंगळे (शाहुवाडी), येलूर (शाहुवाडी), जाधववाडी (शाहुवाडी), पेरीड (शाहूवाडी)
मंगळवार, दि. 3 जानेवारी 2023 रोजी भैरेवाडी (शाहुवाडी), गोगवे (शाहुवाडी), ठमकेवाडी (शाहुवाडी), बांबवडे (शाहूवाडी)
बुधवार, दि. 4 जानेवारी 2022 रोजी चनवाड (शाहुवाडी), कोपार्डे (शाहुवाडी), केर्ले (शाहुवाडी), तळवडे (शाहुवाडी)
याप्रमाणे शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. कदम यांनी कळविले आहे.