no images were found
कोल्हापूर विमानतळावर दोन दहशतवाद्यांचा खात्मा, हायजॅक विमानातील ५० ओलीस प्रवाशाची मुक्तता
कोल्हापूर : मुंबईहून बंगळूरला जाणारे विमान दहशतवाद्यांनी शुक्रवारी हायजॅक केले. हे विमान कोल्हापूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. जवानांनी प्राणाची बाजी लावून दहशतवाद्यांशी ४५ मिनिटे लढा देत ५० प्रवाशांना सुखरूप ताब्यात घेतल. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करून एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले. जवानांनी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे दाखवून दिले.तथापि हा प्रकार खरा नसून मॉक ड्रिल असल्याचे समजल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोलीस यंत्रणा किती सतर्क आहे हे पाहण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर मॉक ड्रिल करण्यात आली. मुंबईहून बंगळूरकडे जाणारे विमान तीन दहशतवाद्यांनी हायजॅक केले आहे. विमानात ५० प्रवासी दहशतवादांच्या ओलीस आहेत. कोल्हापूर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात येणार आहे, असा संदेश कोल्हापूर विमानतळ प्रशासनाकडून पोलिस कंट्रोल रूम व जिल्हा प्रशासनाला काल सायंकाळी ४ वाजून ५९ मिनिटाने मिळाला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क होत जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोध पथक, पोलिस दल, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, एटीएस पथक तसेच अग्निशमन बंब, अॅम्ब्युलन्स असे सारे विमानतळावर तत्काळ हजर झाले.
हायजॅक केलेल्या विमानातील प्रवाशांचे नातेवाईक ‘प्रवाशांचा जीव वाचवा’, अशी गयावया करत रडत होते. दहशतवाद्याकडून हायजॅक केलेले विमान लँडिंग होताच जवानांनी प्राणाची बाजी लावून दहशतवाद्यांशी ४५ मिनिटे लढा देत ५० प्रवाशांना सुखरूप ताब्यात घेतल. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला तर एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले. सपोनी अविनाश माने, एटीएसअधिकारी करपे, विमानतळ अधिकारी विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी मिशन फत्ते झाले .