no images were found
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन सिलेंडर्स, व्हेंटिलेटर्स तयार ठेवा; केंद्राकडून नवे निर्देश
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आल्यानं जगाचे धाब दणाणलं आहे. भारतातही हा प्रकार गांभीर्यानं घेण्यात आला असून केंद्रानं राज्यांना नव्यानं तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. ताजी सहा मुद्द्यांची कोविड अॅडव्हाझरी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यांनी ऑक्सिजन सिलेंडर्स आणि व्हेंटिलेटर्स तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतील तरी तीचं प्रमाणं खूप नाहीए. पण भविष्यातील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रानं राज्यांना तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. नव्यानं काढलेल्या अॅडव्हाझरीत वैद्यकीय पायाभूत सुविधांची देखभाल आणि त्या पुन्हा अॅक्टिव्ह करण्याबाबतचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, तुमच्याकडील मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लॅंट्स पूर्ण क्षमतेनं सुरु करण्याचे तसेच त्याची नियमित तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता तसेच ते पुन्हा विनाव्यत्यय रिफील करण्याची व्यवस्थाही तयार असल्याची खात्री करुन घ्यावी, असे निर्देशही आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिले आहेत.