no images were found
मॉस्कोहून गोव्याला येणारे विमान बॉम्बने उडविण्याची धमकी
रशियाची राजधानी मॉस्कोहून गोव्याला (Moscow- Goa Flight) येणारे अझूर एअरलाइन्सचे चार्टर्ड विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले. या विमानात २४० प्रवासी होते. हे विमान पहाटे ४.१५ वाजता दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावर उतरणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अझूर एअरलाइन्सचे विमान (AZV2463) भारतीय हवाई हद्दीत (Moscow- Goa Flight) पोहोचण्यापूर्वी उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले. दाबोळी विमानतळावरील अधिकाऱ्यांना १२.३० वाजता ईमेलद्वारे या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतरच हे विमान वळविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून समजते. उझबेकिस्तानमधील विमानतळावर सुरक्षितपणे हे विमान उतरविण्यात आलेले आहे.