no images were found
सांगलीचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत लडाखमध्ये शहीद
सांगली : ४० वर्षीय जयसिंग भगत हे २२मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. आज खानापूर या मूळ गावी जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत हे लेह लडाखमध्ये शहीद झाले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिमस्खलनात जयसिंग शंकर भगत यांचा मृत्यू झाला आहे. आज खानापूर या मूळ गावी जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत यांचे पार्थिव लष्कराच्या विशेष विमानाने लडाख मधून पुण्यात येणार आहे. त्यानंतर पुण्यातून खानापूर या त्यांच्या मूळ गावी आणले जाईल आणि त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इत्तमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. ४० वर्षीय जयसिंग भगत हे २२ मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. या घटनेनंतर खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. खानापूर ते गोरेवाडी मार्गावरील भगतमळा परिसरातील मातोश्री मंगल कार्यालयसमोरील पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.