no images were found
आकाशात दिसले लाल रंगाचे मोठे वर्तुळ….
सध्या सोशल मीडियावर तुर्कीमध्ये आकाशात UFO दिसल्याची चर्चा रंगली होती. तुर्कीमध्ये सुमारे एक तासभर आकाशात ही लाल रंगाची गोलाकार तबकडीसारखी प्रतिमा दिसत असल्याने तर्क-वितर्कांना ऊत आला. अनेकांनी मोबाइलमध्ये हे दृश्य कैद करीत सोशल मीडियावर शेअर केले. वर्तुळाकार प्रतिमेच्या मधोमध मोठे गोल छिद्र असल्याने हे UFO च आहे असा अनेकांचा दावा होता. परंतु हे ढग असून त्याला lenticular cloud असं म्हटले जात असल्याचे मत तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
तुर्कीमध्ये आज पहाटे आकाशात गोलाकार लाल तबकडीसारखी प्रतिमा दिसून आली. काहींनी हे नैसर्गिक दृश्य कैद करीत सोशल मीडियावर शेअर केले. काही क्षणातच हे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी हे ढग UFO सारखे दिसत असल्याचा दावा केला. परंतु तुर्कीच्या हवामान विभागाने याबाबत तात्काळ स्पष्टीकरण देत ही दुर्मिळ घटना म्हणजे ‘lenticular cloud’ असल्याचे स्पष्ट केलेय.