
no images were found
आखिल भारतीय आंतरविद्यापीठ मलखांब स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या मुला मुलींच्या संघाला सुवर्णपदक
सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ जयपुर राजस्थान येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मलखांब स्पर्धेचे आयोजन केले होते. या चुरशीच्या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महिला व पुरुष संघाने मलखांब मनोरा स्पर्धेमध्ये आमच्या दोन्हीही संघाने सुवर्णपदक पटकावले.
या विजयी संघातील खेळाडू असे गटातील विजयी खेळाडू महिला संघ. वैष्णवी मोरे (वारणा महाविद्यालय वारणा), अस्मिता मांढरे (वारणा महाविद्यालय वारणा), समिक्षा गावडे (शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज), प्राजक्ता गावडे (शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज), निशा मोळके (अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले), पल्लवी मोरे (डी जी कॉलेज सातारा), पुरुष संघ. दर्षण मिनियार (वारणा महाविद्यालय वारणा), शुभम लगड (वारणा महाविद्यालय वारणा), कुनाल दरवान (वारणा महाविद्यालय वारणा), ओंकार कबुले (के आय टी महाविद्यालय कोल्हापूर), वरील संघ प्रशिक्षक. श्री बापूसाहेब समलेवाले संघ व्यवस्थापक डॉ. राहुल मगदूम काम पाहत आहेत. व वरील खेळाडूंना मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मा. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, मा. रजिस्टर डॉ. व्ही. एन. शिंदे, मा. संचालक- क्रीडा अधिविभाग डॉ. शरद बनसोडे सहकार्य व प्रोत्साहन लाभले. आणि या दोन्ही संघाची गुवाहाटी आसाम विद्यापीठ खेलो इंडियासाठी निवड झाली आहे.