
no images were found
शिवाजी विद्यापीठात डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती
कोल्हापूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी
वनस्पतीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.राजाराम गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, बॅ.बाळासाहेब ज्ञानस्त्रोत केंद्र संचालक डॉ.धनंजय सुतार, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे, डॉ.दत्तात्रय गायकवाड, डॉ.वर्षा जाधव, डॉ.मनोज लेखक, डॉ.सावळीराम घाणे, डॉ.सचिन पाटील, अभिजीत पार्टे, हर्षल व्हटकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.