no images were found
पंतप्रधानांच्या बीकेसी रॅलीत एकाची घुसखोरी; तपास सुरु
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ जानेवारीच्या सायंकाळी बीकेसी येथील रॅलीत एनएसजी कमांडोचे बनावट ओळखपत्र वापरून एकाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने यंत्रणा सावध झाल्या आहेत, या इसमाची चौकशी सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसीतील रॅलीत एनएसजी कमांडोचे बनावट ओळखपत्र वापरून एका व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला; त्यामुळे खळबळ उडाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अतिशय कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या इसमाची कसून चौकशी सुरु आहे.
१९ जानेवारीच्या सायंकाळी बीकेसी येथे पंतप्रधानांच्या हस्ते अनेक सोयी सुविधांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी प्रचंड सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. असे असतानादेखील सुरक्षेचे सर्व नियम तोडून एका सफारी सुट परिधान केलेल्या व्यक्तीने येथे प्रवेश मिळविला.
पंतप्रधानांचा कार्यक्रम असल्यामुळे बीकेसीत विविध पदरी सुरक्षा ठेवण्यात आली होती. परंतू एका इसमाने एनएसजी कंमाडोचे नकली ओळखपत्र गळ्यात अडकवून कडक सफारी परिधान करून बीकेसीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे वृत्त समोर आले आहे. या व्यक्तीच्या एनएसजी कमांडो पदाचे ओळखपत्र तपासले असता. त्यावर 2022 ते 2025 अशी वैधता तारीख लिहीली होती. त्यावर केलेल्या खोडाखोडीमुळे संशय आला. त्या ओळखपत्राला असलेल्या रिबनवर दिल्ली पोलीस सिक्युरीटी PM असे लिहीले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना संशय आला. ही व्यक्ती नवीमुंबई येथील रहिवासी असून त्याचे नाव रमेश मिश्रा आहे. त्याने आपण लष्करात सेवा केलेली असून इंडीयन आर्मीच्या गार्ड रेजिमेंटमध्ये असल्याचा दावा केला आहे, पोलीसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.