no images were found
कलाकारांनी सांगितले त्यांच्या वैश्विक श्रद्धेबाबत!
सकाळी चहाचा आस्वाद घेत राशीभविष्य वाचण्यापासून ते अंकांमधून मार्गदर्शन मिळवण्यापर्यंत ज्योतिष आणि अंकशास्त्र उत्सुकता आणि आनंद निर्माण करतात. काहींसाठी या जुन्या पद्धती आध्यात्मिक संकेत आहेत, तर काहींसाठी त्या दैनंदिन जीवनात उत्तम अनुभव देणाऱ्या आहेत. या वैश्विक संकेतांच्या माध्यमातून खास काहीतरी शोधणाऱ्यांमध्ये एण्ड टीव्हीवरील लोकप्रिय कलाकार देखील आहेत, जसे हिमानी शिवपुरी (कटोरी अम्मा, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी, ‘भाबीजी घर पर है’). त्यांनी ज्योतिष आणि अंकशास्त्र त्यांची विचारसरणी, दिनचर्या व दृष्टिकोनाला कसे आकार देतात, याबद्दल सांगितले. मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये कटोरी अम्माची भूमिका साकारणाऱ्या हिमानी शिवपुरी आनंद व्यक्त करत म्हणाल्या, ”माझा ज्योतिषशास्त्रावर फारसा विश्वास नाही, पण ते वर्षानुवर्षे माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. दररोज सकाळी बाहेर पडण्यापूर्वी मी वर्तमानपत्रातील दिवसाचे राशीभविष्य पाहते. भविष्य जाणून घेण्यासाठी नाही तर दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी करते. काही चांगल्या ओळी तुमचा मूड चांगला करू शकतात. मजेदार गोष्ट म्हणजे, दिवसाच्या शेवटी मी अनेकदा त्यात काय म्हटले आहे ते विसरून जाते, पण आशावाद कायम राहतो.” त्या पुढे म्हणाल्या, ”मंदिरांना भेट देताना किंवा मित्रांसोबत प्रवास करताना बहुतेकदा असाच किंवा एखाद्याच्या आग्रहास्तव मी काही वेळा माझा तळहात वाचायला दिला आहे आणि प्रत्येक ज्योतिषाने काहीतरी वेगळे म्हटले, पण ते सर्व सकारात्मक होते. त्यावेळी मला जाणवले की ज्योतिषशास्त्र मनोरंजक आहे, पण जीवनासाठी मार्गदर्शक नाही. मी कर्मावर आणि माझ्या मानसिकतेवर अधिक अवलंबून आहे. तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे केले आणि दयाळू व सकारात्मक राहिले तर मार्ग नक्की सापडतो असा माझा विश्वास आहे. कदाचित राशीभविष्य नेहमीच अचूक नसते, पण तोच तुमचा दृष्टिकोन आहे का? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.”
रोहिताश्व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्हणाले, ”माझ्यासाठी अंकशास्त्र नेहमी लक्षवेधक रहिले आहे. फक्त भाग्यवान अंक शोधणे नाही तर निर्णय व घटनांमागील ऊर्जा समजून घेणे महत्त्वाचे आहे. जीवनात कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी मी अंकशास्त्राचा सल्ला घेतो. यामुळे मला आधार मिळाल्यासारखे वाटते आणि स्पष्टता मिळते. लोक अनेकदा ते अंधश्रद्धा समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, पण माझ्यासाठी ते उपयुक्त आहे. या अंकांमध्ये लय असते आणि त्यांचे वाचन करायला शिकल्यानंतर मार्गदर्शकासारखे वाटते. गोंधळलेल्या किंवा आव्हानात्मक काळामध्ये मला समजले आहे की, अंकशास्त्रामधून कम्फर्ट व मार्गदर्शन मिळते. हे आधारस्तंभ नाही तर साधन आहे. आणि तुम्हाला संतुलित व आत्मविश्वासू राहण्यास मदत करणाऱ्या गोष्टीचा अवलंब का करू नये? जीवन अनपेक्षित आहे आणि कधी-कधी, थोडेसे मार्गदर्शन देखील खूप उपयुक्त ठरते.”