Home मनोरंजन पंचगंगा घाटाची महापालिकेच्यावतीने फायर फारयटद्वारे स्वच्छता

पंचगंगा घाटाची महापालिकेच्यावतीने फायर फारयटद्वारे स्वच्छता

1 second read
0
0
59

no images were found

पंचगंगा घाटाची महापालिकेच्यावतीने फायर फारयटद्वारे स्वच्छता

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शहरासह जिल्हयामध्ये पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्रात गेले आहे. जिल्हयामध्ये जोरदार पाऊस होऊन पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर आले होते. यावेळी घाटावर पाण्याबरोबर आलेला चिखल संपुर्ण घाटावर पसरला होता. पूराचे पाणी ओसरल्यानंतर चिखलामुळे नागरीकांना घाटावर ये-जा करण्यासाठी अडचण होत होती. त्यामुळे महापालिकेने आज पाणी ओसरल्यानंतर तातडीने या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी पूराच्या पाण्याबरोबर आलेला चिखल अग्निशमन विभागाच्या फायर फायटरने पाणी मारुन काढण्यात आला. यासाठी 1 फायर फायटर व 2 पाण्याचे टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत स्वच्छतेचे हे काम सुरु होते. यासाठी 6 फायरमन, 1 आरोग्य निरिक्षक, 1 मुकादम व 6 सफाई कर्मचा-यांमार्फत सदरचे काम पुर्ण करण्यात आले आहे. सदरची स्वच्छता मोहिमे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांचा अभिनय असलेल्या“लग्नपंचमी”ला प्रचंड प्रतिसाद

मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविल…