Home गौरव सन्मान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

54 second read
0
0
9

no images were found

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

कोल्हापूर  :- आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

            यावेळी कु.आर्या अक्षय पाटील (येहराडून येथे झालेल्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करून चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. या भरिय कामगिरीमुळे प्लेअर ऑफ द गेम या पुरस्कारांची मानकरी ठरल्याबद्दल), कु. सिद्धवी चैतन्य माने (एन.सी.सी. अंतर्गत आयोजित इंटर डायरेक्टोरेट स्पोर्टर्स शुर्टीग स्पर्धेत मध्ये सहभागी होवून, चांगले खेळाचे प्रदर्शन करून राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता दाखविली. तसेच देहरादून येथे माहे सप्टेंबर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल), कु.सलोनी अर्जुन मेस्त्री (स्वातंत्र्य दिनानिमित्य केंद्र सरकारच्या माय भारत पोर्टल व संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यात ए.आय.ची. भुमिका या विषयावरील राष्ट्रीय निबंध स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून देशभरातील १५ हजारांहून अधिक स्पर्धकांमधून देशातील टॉप-२०० मध्ये निवड झाली तसेच महाराष्ट्रातून निवड झालेल्या विद्यार्थ्यामध्ये टॉप ३ मध्ये स्थान पटकाविले. तसेच यापुर्वीही राष्ट्रीय निबंध स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती भवनमध्ये गौरविणेत आले असून, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथील लाल किल्लावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष ई-इन्व्हिटेशन मिळालेबद्दल), कु.सई अभिजीत खतकर (जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सहभाग घेवून, चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण पदक पटकाविलेबद्दल), कु. समृध्दी पाटील (तजाकिस्तान येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ आशियाई कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेवून, चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून कास्य पदक पटकाविलेबद्दल), पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शिंदे (पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, धाडसी कार्यपध्दती व उत्कृष्ट कामगिरिच्या जोरावर १७५ बक्षिसे पटकाविली त्यांच्या या उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविणेत आलेबद्दल) व प्रविण रविंद्र कदम (कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी येथील योगासन असोसिएशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत सहभाग घेवून वरिष्ठ गटात कास्य पदक पटकाविले. त्यांच्या या भरिव कामगिरीमुळे बुलढाणा येथे घेणेत येणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल) या सर्वांचा महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, प्रभाग समिती सभापती वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता शारंगधर देशमुख, आदिल फरास, इंद्रजित बोंद्रे, सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, आरोग्य विशेष समिती सभापती सुरेखा ओटवकर, उपसभापती वैभव माने, पाणी पुरवठा विशेष समिती सभापती सौ.संगीता सावंत, उपसभापती सौ.दिपा काटकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.शिला सोनुले, उपसभापती सौ.पुजा पोवार, क्रीडा समिती सभापती विजयसिंह खाडे-पाटील, उपसभापती रोहित कवाळे, नगरसचिव सुनील बिद्री, नगरसेवक/नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ

बीपीसीएलकडून महाराष्ट्रात भारतगॅस लाइट झिपचा शुभारंभ     मुंबई, कल्याण, रायगड, प…