Home उद्योग स्कोडा ऑटो इंडियाने नवीन स्लाव्हियाचे केले अनावरण

स्कोडा ऑटो इंडियाने नवीन स्लाव्हियाचे केले अनावरण

5 second read
0
0
9

no images were found

स्कोडा ऑटो इंडियाने नवीन स्लाव्हियाचे केले अनावरण
ऑक्टाव्हिया आरएस आणि पूर्णपणे नवीन सुपर्बच्या आगमनाचीही घोषणा

कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडियाने नवीन स्लाव्हियाचे अनावरण केले असून, आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव यावर या नव्या मॉडेलमध्ये भर देण्यात आला आहे. यासोबतच भारतात ऑक्टाव्हिया आरएसची नवीन बॅच आणि पूर्णपणे नवीन सुपर्ब आणण्याची घोषणा कंपनीने केली आहे.
नवीन स्लाव्हियामध्ये सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्ससह नवीन एलईडी हेडलॅम्प व टेललॅम्प्स, नवीन अलॉय डिझाइन्स आणि रिफ्रेश इंटीरियर देण्यात आले आहे. १.० टीएसआय इंजिनसोबत नवीन ८-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक, तर १.५ टीएसआयसोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड डीएसजी पर्याय उपलब्ध आहेत.
सेगमेंटमध्ये प्रथमच रिअर सीट मसाज फंक्शन देण्यात आले असून, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, पार्क पायलट आणि ३६०-डिग्री एरिया व्ह्यू कॅमेरा यांसारख्या सुविधा मिळतात. नेक्स्ट-जनरेशन इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये गुगल क्लाउडद्वारे समर्थित एआय कंपेनियन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अँपल कार प्ल्ये देण्यात आले आहेत.
सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्जसह विविध सक्रिय व निष्क्रिय सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. ग्राहकांना ४ वर्षांची वॉरंटी, ४ वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स आणि ४ लेबर-फ्री सर्व्हिसेस असलेले स्कोडा सुपर केयर पॅकेज मिळणार आहे.
नवीन स्लाव्हिया क्लासिक , क्लासिक +, सिग्नेचर , स्पोर्टलाईन , प्रेस्टिज आणि प्रथमच मोंटे कारलो ट्रिममध्ये उपलब्ध होईल. प्री-बुकिंग १५,००० रुपयांमध्ये सुरू झाले असून, ऑक्टाव्हिया आरएससाठीही प्री-बुकिंग सुरू आहे.
स्कोडा ऑटोचे सीईओ क्लॉस झेलमर यांनी भारताला कंपनीच्या महत्त्वाच्या जागतिक वाढीच्या बाजारपेठांपैकी एक असल्याचे सांगत, ग्राहकांचा विश्वास आणि मजबूत स्थानिक उपस्थितीच्या जोरावर भारतातील वाढीचा पुढील अध्याय लिहिण्याचा विश्वास व्यक्त केला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे यश

आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे यश कोल्हापूर: देवभूम…