no images were found
ध्वजनिधी संकलनासाठी कार्यालयांनी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड
कोल्हापूर, : सशस्त्र सेना दलातून निवृत्त जवान , युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणाने राबविण्यासाठी ध्वजनिधी संकलन केले जाते. या संकलनासाठी ज्या कार्यालयांनी अद्याप आपले योगदान दिले नाही त्या कार्यालयांनी आगामी पंधरा दिवसात शंभर टक्के ध्वजनिधी संकलन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी दिले.
ध्वजनिधी संकलनाच्या अनुषंगाने जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज फेर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी म्हणाले,कोल्हापूर जिल्ह्यासाठी शासनाकडून 2025 या वर्षासाठी ध्वजनिधी संकलनाचे सुमारे एक कोटी ऐंशी लाख रुपये इतके उद्दिष्ट मिळाले आहे.जिल्ह्यातील सर्व नगर पालिका आणि तहसील कार्यालयांनी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे .यावेळी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय तंत्रनिकेतन संस्थेने त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत सुमारे साडे तीनशे टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संस्थेचे विशेष अभिनंदन या बैठकीत केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पोलीस विभागाच्या सुवर्णा पत्की, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांच्यासह इतर विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.